शेतकर्‍यांना न्याय द्या खा.डॉ.सुजय विखे पा. यांची लोकसभेत मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली – देशातील कांदा उत्पदकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवून  निर्यात अनुदानाची मुदत आणखी सहा महीन्यांकरिता वाढवून  द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केली.

संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात खा.डाॅ सुजय विखे पाटील यांनी शून्य प्रहरात कांदा उत्पादकांच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि  अर्थिक  संकटाला तोंड आहे.अडचणीवर मात करून शेतकर्याना कांद्याचे  उत्पादन हाती आले असताना न मिळणारा भाव आणि निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे शेतकर्यांवर संकटात सापडला आहे.

या प्रश्नावर आज खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले,याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,सध्या  उत्पादीत केलेल्या कांद्याला निर्यात करण्याची परवानगी दिली तर शेतकर्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल.सरकारने मागील काही दिवसांपासून निर्यात अनुदान बंद केल्याने शेतकर्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

त्यामुळेच निर्यात अनुदानाची मुदत सहा महीने वाढविल्यास शेतकर्याना त्याचा निश्चितच लाभ होईल याबाबत केद्र सरकारने गांभीर्याने विचार   करून निर्णय करावा आशी मागणी खा.डाॅ.विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Sujay Vikhe