नगर दक्षिणेत सुजय पर्व ! सुजय विखे पाटलांचा विजय निश्चीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात अखेर भाजपचे डॉ.सुजय विखे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांना दीड लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.

शरद पवार,माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वता प्रचारात सहभाग आणि दखल घेतल्याने ही जागा देशात आणि राज्यात चर्चेत होती.

आज सकाळी मतमोजणीच्या सुरवातीपासूनच सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती,प्रत्येक फेरीत सुजय विखे यांनी आघाडी घेतली.

नगर दक्षिणेत प्रचंड लीड घेतल्यामुळे डॉ. सुजय विखे समर्थकांनी जल्लोष सुरु केला.

Live Updates 

1,77,788 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 4,35,137मते 
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 2,57.349 मते मिळालीत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24