अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यात बिघडलेली राजकीय समीकरण या परिस्थितीमुळे तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित झावरे पाटील यांची निवडणुकीत झालेली फसवणूक त्यामुळे सहन करावा लागलेला राजकीय फटका त्यामुळे सुजित झावरे पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह
यामुळे विधानसभा निकाला नंतर सुजित झावरे’चे तालुक्याच्या राजकारणात काय होणार हा विरोधकांना पडलेल्या प्रश्नाला सुजित झावरे पाटील यांनी आपल्या कृतीतून दिलेल्या उत्तरा’ने समोरच्याने तर तोंडात बोटच घातले आहे.
देवकृपा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून झावरे यांचे कोणताही बडेजाव न करता पारनेर तालुक्यात सुरू असलेले सामाजिक कामे जिल्हा परिषदेच्या व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध विकास कामांची होत असलेली उद्घाटने तर विकासकामे करणे ही सुजित झावरे यांची तालुक्याच्या राजकारणात असलेली जमेचीबाजू आहे.
त्यामुळे सुरू असलेल्या दररोजच्या दिनक्रमामुळे पुढील काळात सुजित झावरे पाटील हे तालुक्यासाठी नक्कीच सुवर्णयुग घेऊन परत येतील यात तीळ मात्र शंका नाही.
पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्याला दिलेली विकासाची दिशा तोच वारसा पुढे सध्याच्या घडीला चालवत असलेले त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्याकडे संपूर्ण तालुका एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून पहात आहे.
परंतु सत्ताधाऱ्यांनी तर तालुक्यात सूत्रांच्या माध्यमातून जमविलेले जाहिरात मित्र यावरच रंगवीत असलेले आपले पुढील राजकीय चित्र हे तालुक्याला कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे आता सांगणे कठीण होऊन बसले आहे.