अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर ;- जिल्हापरिषद अध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी कडून राजश्री घुले यांचे नाव निश्चित झाले असताना दोन दिवसांवर आलेल्या पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी नगर येथे पार पडली.
स्थानिक राजकारणातील कुरघोडीमुळे अलीकडे सुजित झावरे यांना सहन करावा लागलेला मनस्ताप त्यामुळे ते राष्ट्रवादी मध्ये कोणत्याही प्रकियेत सहभागी होत नव्हते
परंतु या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पासून अलिप्त झालेले जिल्हा परिषदचे मा. उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या उपस्थितीने झावरे विरोधकांच्या भुव्या उंचावल्या आहेत.
सुजित झावरे यांचा शरद पवार या नेतृत्वावर असलेला पूर्ण विश्वास हाच त्यांचा बैठकीला उपस्थिती राहण्यामागे उद्धेश असावा ही पारनेर तालुक्यातील स्थानिक पक्षातील विरोधकांमध्ये चर्चा आहे.
पक्षाच्या बैठकीला हजेरी लावून मी राष्ट्रवादी विचारा सोबतच आहे हेच सुजित झावरे यांनी दाखवून दिले आहे.
परंतु सुजित झावरे यांच्या समोर पक्षामध्ये तालुक्यातच असलेला जहाल विरोध ते कशा प्रकारे मवाळ करणार हे पुढील काळात पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
या सगळ्यात पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीची राजकीय समीकरणे कशी जुळणार की ते झावरे जुळवणार हे पहाणे आता पुढीलकाळात रंजक ठरणार आहे.