अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माणसाचे शरीराआधी मन आजारी पडतं, त्यामुळे चांगल्या व स्वस्थ शरीरासाठी मन सांभाळा. माणूस म्हणून जगण्यासाठी मनातला द्वेष काढून टाका. समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत रहावे.
मात्र, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री तथा बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा सुनंदाताई पवार यांनी पत्रकारांच्या स्नेहमीलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
जामखेड येथे दि.६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारदिनी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सृजन व बारामती ॲग्रोच्या वतीने जामखेड तालुक्यातील पत्रकारांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजे भोसले, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, काँग्रेसचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, हास्य कवी मकरंद टिल्लू, पत्रकार वसंत सानप,
अशोक निमोणकर, मिठ्ठूलाल नवलाखा, नासीर पठाण, यासीन शेख, अविनाश बोधले, सत्तार शेख, मोहिद्दीन तांबोळी, ओकार दळवी, तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार सहकुटुंब उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाल्या, आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून जे नवीन घडेल ते जामखेड -कर्जत मतदारसंघातमध्ये प्रथमच घडेल, त्यासाठी राजकीय द्वेष न करता माणूस म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
या वेळी पत्रकार वसंत सानप, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राजे भोसले यांची भाषणे झाली. कार्यक्रमापूर्वी मकरंद टिल्लू यांचा हसा आणि निरोगी रहा, यावर कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी आनंदी जीवन कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले.