मुंबई :- आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार भाजपला मिळाल्याचं यातून स्पष्ट झालं. या सगळ्या घडामोडींमुळं एकीकडं राज्यात खळबळ उडाली असताना पवार कुटुंबीयांमध्येही प्रचंड अस्वस्थता आहे.
फक्त सत्तेसाठी पवार कुटुंबात फाटाफूट नको, अजित दादा काहीही कर, पण लवकर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, अस भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवार यांना केलय.
आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको.
तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
मात्र, यावर अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही. आज सकाळी अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे.
राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेच, पण पवार कुटुंबही कमालीचं दुखावलं आहे.
आज सकाळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्टेटस बदलून नाराजी स्पष्ट कबुली दिली, ‘पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत. विश्वास नेमका ठेवायचा कुणावर?,’ असं भावनिक स्टेट्स सुप्रिया यांनी ठेवलं होत.