सुप्रिया सुळे म्हणाल्या पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारकडून पाठविलेली ईडीच्या नोटीस व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले.आता शिवसेनेला इडीची नोटीस पाठविली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल, असा  विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त शनिवारी (दि. २८) आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार संजय जगताप, प्रदीप गारटकर, राजू खांडभोर, यादवेंद्र खळदे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रजित वाघमारे व ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24