अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- राज्य सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हि मोहीम आखली आहे. यासाठी विविध स्तरावरील कामाचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात आशा स्वयंसेविकांचाही समावेश आहे.
परंतु या मोहिमेत सर्वेक्षणाचे काम चांगले करू; पण डाटा एंट्रीचे काम डाटा ऑपरेटर यांच्याकडून करण्यात यावे, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक संघटनेने तालुका वैद्यकीय अधिकारी सलमा हिरामी यांच्याकडे केली आहे.
निवेदनावर वैशाली वाघुले, सुरेखा राऊत, वैशाली देशमुख, अलका पाचे, सुनैत्रा महाजन, अंजली भुजबळ, सुलभा महाजन, पौर्णिमा इंगळे, गीता थोरवे, शीतल थोरवे, रत्नमाला क्षीरसागर, सुनीता गांडुळे, वैशाली भुतकर,अनिता भुजबळ आदी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, सर्वच आशा स्वयंसेविका यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही, तसेच कोणतेही प्रशिक्षण नसल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत ऑनलाईन डाटा एंट्री करण्यास आशा व गटप्रवर्तक असमर्थ आहेत. तरी ऑनलाईन सर्व्हेच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved