अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथे कुंभार गल्ली भागात सासरी नांदत असताना तसेच डॉ. सायली संदीप लिपाणे यांचे दवाखान्यात सोनई येथे दि. २०/९२/२०१५ लग्न झालेनंतर एक वर्षांपासुन ते दि. २१/२/२०२० दरम्यान वेळोवेळी विवाहित तरुणी सो. भारती अजय कदम, वय २२ हिला माहेरून स्वीप्ट कार घेऊन ये यासाठी तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेवुन तू पैसे घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.
तसेच विवाहित तरुणीचा गर्भपात केला. शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरुणी भारती अजय कदम हिच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा अजय अण्णासाहेब कदम, सासरा अण्णासाहेब कचरू कदम,
सासू अनिता अण्णासाहेब कदम, नणंद प्रतिक्षा अण्णासाहेब कदम, दिर विजय अण्णासाहेख कदम, आजेसासरा कचरू नाना कदम, आजेसासू रखमाबाई कचरू कदम, चुलत सासरा गणेश कचरू कदम,
मामेसासरा चंद्रकांत सुखदेव वाकचौरे, सर्व रा. कुं भार गल्ली, सोनई यांच्याविरुद्ध सोनई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ आव्हाड हे पुढील तपास करीत हेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved