या पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे अंमलदाराच्या अगदी समोर लावलेल्या वाळु तस्काराच्या टेम्पोचे टायर आणि डिस्क चोरी गेले होते.

त्यात चक्क चोरटे आणि पोलीस यांनीच हा पराक्रम केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्याना निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे निलंबन केले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भोसले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय दुडवाल व वाहनचालक चंद्रकांत विठ्ठल सदाकाळ यांना निलंबित करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी पोलिसांनी वाळू तस्करी प्रकरणी तालुक्यातील गणेश शंकर आवारी यांचा टेम्पो ताब्यात घेतला होता.

हा टेम्पो पोलिस ठाण्याच्या आवारात असताना जून महिन्यात टेम्पोचे डिस्कसह दोन चाके चोरीला गेले. ही चोरी उघडकीस आली असून पोलिसांनी चोरी प्रकरणी विनायक नरहरी साबळे यास ताब्यात घेतले.

या तीन पोलीस कर्मचारी यांनी मदत केल्याचा ठपका आला होता. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी अहवाल सादर केला. अधीक्षकांनी कारवाई करत तिघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24