महाराष्ट्र

पंजाबराव डख यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा पुरस्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

Panjabrao Dakh : येथील मराठवाडा मित्र मंडळ अहमदनगरचा दरवर्षी देण्यात येणारा स्वामी रामानंद तीर्थ गौरव पुरस्कार हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना जाहिर झाला असुन, पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १७) सी. एस. आर. डी. येथील सभागृहात संपन्न होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली.

मराठवाडयात जन्मलेला पण आपल्या कार्यकर्तृत्वाने मराठवाडया बाहेर आपले नावलौकिक करणाऱ्या व्यक्तीला सदर पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत अनेर मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदाचा पुरस्कार सेलू येथे कार्यरत असणारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना प्रदान करण्यात येत आहे, असे निवड समितीच्या वतीने डॉ. सुधा कांकरिया यांनी सांगितले.

सदर समारंभाचे अध्यक्ष लखनऊ विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्जेराव निमसे भुषवणार असुन, आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते समारंभपूर्वक सदर पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

प्रमुख पाहुणे म्हणुन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग श्री सचिन कंद हे उपस्थित राहतील, अशी माहिती निसर्ग व पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांनी दिली.

कार्यक्रमात देशभक्तीपर व पर्यावरण पुरक गीत-नृत्याची बहारदार मैफिल नृत्यझंकारच्या प्रिया ओगले जोशी यांच्या विद्यार्थीनी सादर करणार – आहेत. जास्तीत जास्त व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष सदाशिव मोहिते व सचिव उमाकांत जांभळे यांनी केले.

Ahmednagarlive24 Office