अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी झाली आहे.
यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपा प्रवक्ते आ. राम कदम यांनी पोलिसांकडे पत्र देऊन केली आहे.
तर संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे दैवत असून महाराष्ट्रातील ११ कोटी जनता ही त्यांची वंशज आहे. तंगड्या तोडण्याची भाषा लोकशाहीत चालत नाही.
प्रत्येकाला तंगड्या असतात, असे सुनावले आहे