अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- शहराची बदनामी करणारे व दलित युवकास शिवीगाळ करणार्या काँग्रेसच्या पदाधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतल्या सर्व संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन प्र.पोलीस अधिक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांना देण्यात आले. यावेळी सर्व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सिध्दार्थनगर येथे अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत असणार्या पार्किंगची पावती वसूल करणार्या दलित तरुणास काँग्रेसच्या पदाधिकार्याने जातीवाचक आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ करून धमकावले.
यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते दलित तरुणाला धमकावताना दिसत आले.अहमदनगर शहराला बिहार म्हणून संबोधणारे तसेच शहराची बदनामी करणारे काळे एका कष्टकरी दलित तरुणावर अन्याय करताना दिसत असल्यामुळे सदर बाब अत्यंत निंदनीय आहे.
तर दलित अस्मितेला धक्का पोहचवणारी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काळे दादागिरी करुन जातीयवादीपणे पदाचा गैरवापर करून मंत्र्यांचे नाव घेऊन खुलेआमपणे दलित तरुणाला धमकावताना व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
यासारख्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी किरण काळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी शहरातील शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतल्या संघटनांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved