अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महान व्यक्तींचा अवमान करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व महिला आघाडीने केली आहे. या मागणीसाठी मंगळवारी (दि.१४) दुपारी जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.
भाजपाचा एक नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक लिहितो. तर दुसरीकडे पुण्यात भाजपाच्या महिला नेत्या सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात.
देशात हे काय सुरू आहे? भाजपाला सत्ता दिली म्हणून त्यांना सत्तेचा माज चढला आहे काय? असा सवाल यावेळी करण्यात आला.
या वाचाळवीर भाजपा नेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेश्माताई आठरे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष अभिजित खोसे, परेश पुरोहित, निलेश बांगरे, सारिका खताडे, लता गायकवाड, अलिशा गर्जे, मनिषा आठरे, उषा सोनटक्के, अमित खामकर, लहू कानडे, ऋषिकेश ताठे, शुभम फाळके, संगिता कुलट, सुनंदा कांबळे, सुनिता पाचारणे, अपर्णा पालवे, शितल राऊत, शितल गाडे, किरण कटारिया, सुरेखा कडूस, वैशाली भापकर, उषा थोरात, वर्षा पाटोळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.