दोन दिवसांत धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढा अन्यथा आत्महत्या !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : दोन दिवसांत धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढा अन्यथा आत्महत्या करीन, असा व्हीडिओ बारामती येथील किशोर मासाळ, या धनगर समाजाच्या तरुणाने समाजमाध्यमावर टाकला आहे.

आम्हाला समक्ष सांगणारे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आमच्याशी आतापर्यंत खोटे वागले, त्यामुळे माझ्या आत्महत्येचा गुन्हा या सरकारवर दाखल करावा, असा व्हिडिओ व्यथित झालेल्या किशोर मासाळ यांनी समाजमाध्यमावर टाकला आहे.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे गेल्या १३ दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे. दोन्ही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यभरातून विविध ठिकाणी रास्ता रोको, उपोषणे, सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, असे आंदोलन केले जात आहे

किशोर मासाळ हा सामाजिक, राजकीय क्षेत्रात तसेच चळवळीत सातत्याने अग्रभागी राहणारे समाजासाठी सतत धडपड करणारा तरुण कार्यकर्ता आहे. १३ दिवसांपासून चौंडी येथे आमरण उपोषण सुरू असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली.

एकाला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे तर दुसरे सलाईन पाणी घेण्यासही तयार नाहीत. समाजाच्या आरक्षणासाठी आहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी प्राण सोडण्यास तयार आहेत. तरीही सरकारला जाग येईना.सरकार कसलीही दखल घेतली नाही. तेव्हा मी आत्महत्या करत आहे, असे किशोर मासाळ यांनी चौंडी येथे राज्यव्यापी बैठकीत सांगितले