अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर दुसरे आसाराम बापू असल्याचा आरोप केला आहे.#MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर तनुश्रीने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.
याप्रकरणी काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी तिने तिच्या वकिलासोबत पत्रकार परिषद घेतली.तनुश्री दत्ता म्हणाली, “नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी मला फसवून या प्रकरणातील पुरावे नष्ट केले.
बॉलिवूड माझं पॅशन होतं. यांनी ते हिरावून घेतलं. यांनी माझं करिअर खराब केलंय. त्यांनी माझं 24 व्या वर्षी लैंगिक शोषण केलं. त्यामुळे मी यापैकी एकालाही सोडणार नाही.
हे सगळ्यांना पैसे खाऊ घालतात. मी शेवटपर्यंत लढेल. हे सगळे आता म्हातारे झालेत. मी अजून तरुण आहे. या सगळ्यांना रडवल्याशिवाय राहणार नाही. आता पुन्हा हे प्रकरण सुरु होतंय. यांनी त्यांचा गुन्हा मान्य करावा. त्यांना जास्त त्रास होणार नाही, असंही तनुश्रीने नमूद केलं.
या पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले.ती म्हणाली, “नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला.
परदेशातून आलेला सर्व पैसे जातो कुठे ? गरिबांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढला की यांचं काम झालं, असं देखील तनुश्री म्हाणालीये.
नाना पाटेकर यांनी नाम या संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या. हा पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटायचा आणि फोटो काढायचा की यांचा काम झालं.