Tata Motors : जर तुम्ही टाटांच्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण Tata Motors यावर्षी भारतीय बाजारपेठेत आपल्या काही लोकप्रिय वाहनांचे रेड डार्क एडिशन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
याबाबत कंपनीने एक टीझर रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये तीन एसयूव्ही शेजारी दिसत आहेत. ज्यामध्ये Harrier आणि Safari व्यतिरिक्त Nexon दिसत आहे. ही तिन्ही वाहने लवकरच रेड डार्क एडिशनने सुसज्ज होणार आहेत.
हॅरियर आणि सफारी रेड डार्क एडिशन पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2023 मध्ये पाहण्यात आले होते. दोन्ही SUV ला लाल हायलाइट्ससह ऑल-ब्लॅक एक्सटीरियर फिनिश मिळते, तर इंटीरियरला लाल अपहोल्स्ट्री थीम मिळते.
वैशिष्ट्ये
हॅरियर आणि सफारी त्यांच्या 2023 च्या ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह तसेच 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरे आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या आवृत्त्यांवर आधारित असतील.
बुकिंग कधी सुरु होणार?
टाटाने 16 फेब्रुवारी 2023 रोजी अपडेट केलेल्या हॅरियर आणि सफारीसाठी बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आणि मार्च 2023 च्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, BS6 फेज 2 इंजिनची जोडणी आणि काही फीचर अपडेट्समुळे सफारीच्या एक्स-शोरूम किमती किमान 50,000 रुपयांनी वाढण्याची अपेक्षा आहे, तर टॉप मॉडेल XZ प्लस ट्रिम व्हेरिएंटची किंमत 1.5 लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. कारण, या मॉडेलमध्ये एलईडी फीचर देण्यात आले आहे. नवीन टाटा सफारी रेंजची अपेक्षित किंमत 16 लाख ते 24.5 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.