राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जिल्हा दौर्‍यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 22 जानेवारी, 2021 रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सकाळी 10 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड अहमदनगर येथे आगमन व मोटारीने अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 10-15 वाजता महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे आगमन.

सकाळी 10.15 ते 11.45 वाजता अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा (जिल्हाधिकारी, आयुक्त, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी).

सकाळी 11.45 वाजता महानगरपालिका कार्यालय येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.

दुपारी 12 ते 1.30 वाजता अहमदनगर जिल्हयातील नगरपरिषद व नगर ग्रामपंचायतीअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा (जिल्हाधिकारी, संबंधीत मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी) स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय,

अहमदनगर. दुपारी 1.30 ते 1.45 वाजता पत्रकार परिषद स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर, दुपारी 1.45 ते 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,

अहमदनगर येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने ठाणे रेमंड हेलिपॅडकडे प्रयाण.

अहमदनगर लाईव्ह 24