सातवा वेतन आयोगाच्या मागणीसाठी शिक्षकांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्यांनी आज कृषी विद्यापिठाच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत वेतन आयोग लागू करावा अशी मागणी केली आहे.

या आंदोलनात कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी, प्राध्यापक, महिला कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती केली होती. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणापासून सुरु झालेला हा मोर्चा विद्यापीठातील फुले पुतळ्यामार्गे जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासकीय इमारतीजवळ थांबविण्यात आला.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन विभागातील सुहास हराळे यांच्याकडे निवेदन देवून शासनाच्या दुर्लक्षाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

विद्यापीठातील दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ता. 27 पासून सर्व कार्यक्षेत्रातील कर्मचारी काळ्या फिती लावून काम सुरु आहे. आज या आंदोलनाचा दुसरा टप्प्यामध्ये ता. 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

6 नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सामुहिक रजा घेवून 7 नोव्हेंबर पासून सर्व अधिकारी व कर्मचारी बेमुदत लेखनीबंद आंदोलन करणार आहेत.

या आशयाचे निवेदन राज्याचे मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या सह अन्य मंत्रीमंडळातील सदस्यांना, कृषी परिषदेसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांना यापुर्वीच दिलेले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24