अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : अकोल्यातील राजूर गावातील बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांच्या पातळीवर कधीही लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेण्यात येतात. मात्र, यासंदर्भात व्यवसायधंद्यातील लोकांंचे मला फोन येतात.
तेव्हा राजूर ग्रामपंचायतीला हे अधिकार आहेत काय? तसे अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला नसतील, तर तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावून गुन्हे दाखल करावेत,
असे आदेशच अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडून तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आल्याचे संभाषण व्हायरल होताच तालुक्यातून राजकीय क्षेत्रातून एकच खळबळ उडाली.
राजूर ग्रामपंचायतवर माजी आमदार वैभव पिचड यांचा वरचष्मा आहे. त्यामुळेच अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे व राष्ट्रवादीचे आमदार डॉ. लहामटे यांच्यातील संभाषण व्हायरल होताच राजकीय क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे व अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यात शनिवारी राजूर ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत असलेल्या
कोरोना लाॅकडाऊन कामकाजाबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येत असून यावर निर्बंध आणण्यासाठीचे मोबाइल फोनवर झालेले संभाषण व्हायरल झाले.
या संभाषणात आमदार डॉ. लहामटे हे तहसीलदार कांबळे यांना काही सूचना करतानाचे संभाषण आहे. आमदार सांगत आहेत की, कोरोना लाॅकडाऊन संदर्भात तुमच्याकडून राजूर ग्रामपंचायतला कायदेशीर कारवाईची नोटीस बजावावी.
त्यानंतर अनधिकृत लाॅकडाऊन केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना आमदार लहामटे तहसीलदारांना करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews