अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात गेली अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळीच्या पार्शवभूमीवर सरकारने मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली.
त्यानंतर अनेक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा देखील सुरु केली.
यातच कुलदेवी म्हणून ख्याती असलेली तुळजाभवानी देवस्थान समितीची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन आणि गैरवर्तन केल्याने तुळजाभवानी देवीच्या 24 पुजाऱ्यावर तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने कारवाई केली आहे.
8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत तर इतर 16 पुजाऱ्यांना 6 महिनेसाठी मंदिर प्रवेश बंदी का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने तहसीलदार सौदागर तांदळे यांनी ही प्रवेशबंदीची कारवाई केली आहे. पुजारी अभिजीत कुतवळ, कुलदीप औटी, पंकज कदम, संपत गंगणे, संदीप टोले, लखन भोसले, ओंकार भिसे व आकाश परदेशी या
8 पुजाऱ्यांना 3 महिने मंदिर प्रवेश बंदी केली असून 6 महिने मंदिर प्रवेश बंदी का वाढवू नये अशी नोटीस बजावली आहे.