तेल घेवून जाणार्‍या टँकरला टेम्पोने दिली धडक…. हजारो लिटर तेल गेले वाया

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसेवा पुर्वव्रत झाल्या आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था देखील सुरु झाली आहे.

यातच महामार्गावर अपघाताच्या घटनां देखील घडू लागल्या आहेत. यातच संगमेनर तालुक्यात एका महामार्गावर तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टेम्पोने धडक दिल्याची घटना आज घडली आहे.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू टँकर (क्र. एमएच.46, एफ.4423) चालक हा धुळेहून सोयाबीनचे वीस टन कच्चे तेल घेवून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होता.

शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा टँकर नवीन माहुली एकल घाटात आला असता त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणारा आयशर टेम्पोने (क्र.एमएच.42, टी.2179) टँकरला पाठीमागून जोराची धडक दिली.

यावेळी टँकरला दोन ठिकाणी मोठ्या चिरा पडून तेल महामार्गावर वाहू लागले. तेलाच्या टँकरला पाठीमागून आयशर टेम्पोने दिलेली धडक एवढ्या जोराची होती कि, यामुळे महामार्गावर अंदाजे दहा हजार लिटर तेलाचा सडा पडल्याचे दिसले.

तर या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह

आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर तेल गळती झाल्याने टोलनाक्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव मदतकार्य केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24