Maharashtra News : जनावरांना निर्दयतेने वागणुक देऊन टेम्पोतून वाहतुक करणाऱ्या दोघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या ताब्यातून १ लाख ४५ हजार रूपये किमतीची जनावरे व ५ लाख रूपये किमतीचा टेम्पो असा ६ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मोहम्मद युसूफ गफूर मोमीन (वय ५४, रा. शिवाजीनगर, मुंबई) व मोहम्मद शानु युनूस कुरेशी (वय २४, रा. बुलंदशहर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. देवनार, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार विक्रांत भालसिंग यांनी फिर्याद दिली आहे.
नगर-सोलापूर रस्त्यावरील दहीगाव (ता. नगर) शिवारात शनिवारी (दि.९) रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही कारवाई केली. नगर-सोलापूर रस्त्यावरून म्हैस वर्गीय जनावरांची निर्दयतेने वागणुक देऊन टेम्पोतून वाहतुक केली जात असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी पथकासह दहीगाव शिवारात सापळा लावून संशयित टेम्पो (क्र. एमएच ०३ डीव्ही ४६४१) पकडला. त्या टेम्पोतून १२ जनावरे वाहतुक करण्याचा परवाना असताना
२९ जनावरांची चारा व पाण्याविणा, दाटीवाटीने निर्दयतेने वागणुक देऊन वाहतुक केली जात असल्याचे पोलिसांच्या लक्ष्यात आले. पोलिसांनी टेम्पोतील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील २९ जनावरांची सुटका केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.