अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून एक्स्प्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉइंटवर आयशर ट्रकनं तीन मोटारसायकलना चिरडल्याची भयंकर घटना घडली आहे. या भीषण अपघातात मुळ लातूरच्या असलेल्या ५ मित्रांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (दि. १) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. एक जण लघवीला बाजूला गेलेला असल्यानं बचावला.
प्रदीप प्रकाश चोळे (वय ३८), अमोल बालाजी चिलमे (वय २९), नारायण राम गुंडाळे (वय २७), निवृत्ती राम गुंडाळे (वय ३०), गोविंद नलवाड (वय ३५, मूळ रा. लातूर, सध्या रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे असून, बालाजी हरिश्चंद्र भंडारी (वय ३५) हे सुखरूप बचावले आहेत.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो (एमएच ४६ बीबी १८३०) चालक हा पुण्याहून मुंबईकडे पिठाची पोती घेऊन चालला होता.
यावेळी खंडाळा येथील अंडा पॉइंट या ठिकाणच्या तीव्र व धोकादायक वळणावर टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या सहा जणांच्या (दुचाकी क्रमांक एमएच १४ एफके ४०९७, एमएच १४ एफएच ५७९३ व एमएच १४ सीव्ही ०२४६) अंगावर पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com