टेंशन वाढले : अहमदनगर मध्ये अजुन एक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह ! राज्यातील संख्या ३ हजारच्या पुढे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे.अहमदनगर जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येत आज वाढ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला असल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

165 more #COVID19 cases (including 107 in Mumbai) reported in Maharashtra today, taking the total number of coronavirus cases in the state to 3081: State Health Department pic.twitter.com/a1xpyzfyrX

— ANI (@ANI) April 16, 2020

महाराष्ट्रात आज आणखी नवीन १६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यात अहमदनगर जिल्ह्यातील एकासह मुंबईतील तब्बल १०७ रुग्णांचा समावेश आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आणखी चार रुग्ण सापडले आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

अहमदनगर, चंद्रपूर व पनवेल शहरात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३०८१ झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

राज्यभरात तापर्यंत एकूण रुग्णसंख्या ३०८१ झाली आहे. भारतात गेल्या २४ तासात ३७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४१४ वर पोहोचली आहे. भारतात सध्या करोनाचे १२,३८० रुग्ण आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24