ई-पासबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारनंतर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकारने ई-पासबाबद मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम ठेवले आहेत. यामध्ये आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक ४ संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

यामळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधनं शिथील झाली आहेत. यामुळे प्रवास करताना आता ई-पासची गरज नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘अनलॉक ४’ ची नियमावली जाहीर करताना केंद्र सरकारने मेट्रो सेवा, सार्वजनिक कार्यक्रम, शैक्षणिक संस्था यांना अंशत: परवानगी दिली.

तसंच राज्यांतर्गत व आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नसल्याचेही केंद्र सरकारने म्हटलं होतं. राज्य सरकारने खासगी तसंच मिनी बसेसना परवानगी दिली आहे. हॉटेल आणि लॉज यांनाही पूर्णपणे सुरु होण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने शाळा,

कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावर बंधनं कायम आहेत. जिम सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24