Maharashtra News : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाची सध्या महाराष्ट्रात तारेवरची कसरत सुरु आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार संघातील तिढा डोकेदुखी बनला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची जोरदार तयारी आणि बबनराव घोलप यांची नाराजी व एकला चलो ची भूमिका यामुळे शिर्डीचा तिढा वाढला आहे.
आता वाकचौरे हे बैठकीसाठी मातोश्रीवर गेले. तर ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप बैठकीला गैरहजर राहिले. उलट त्यांनी मला बैठकीला बोलवलच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढेल कि काय अशी चिन्हे दिसू लागलि आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. त्या दौऱ्यात भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रोमोट केल्याचे चर्चीले जात आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांना राजीनामा दिला. अनेक पक्षांतर केल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने बबनराव घोलप नाराज आहेत.
या उलट शिर्डी लोकसभा मतदारसंघाची तयारी करण्यास पक्षाने सांगितले आहे असे वाकचौरे म्हणताहेत. बबनराव घोलप मात्र यावर नाराज आहेत.
स्थानिक पदाधिकाऱ्यांची नेमकी काय मागणी ?
शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार हे ठरविण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात बैठक झाली होती. त्यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून आमच्यासोबत राहिले आहेत.
त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देत संजय राऊत यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बैठक पुन्हा मातोश्रीवर झाली असून, त्यासाठी भाऊसाहेब वाकचौरे येथे पोहोचले , मात्र बबनराव घोलप उपस्थित नाहीत.
बबनराव घोलप यांची नाराजी कशी घालवणार ?
उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. वाकचौरे यांना उमेदवारी द्यायची होती,
तर त्यांनी मला आश्वासन का दिले? असेही त्यांनी विचारले. त्यामुळे आता हे नाराजी शिवसनेला (ठाकरे गट ) परवडणारी नाही. त्यामुळे ता त्यांची नाराजगी कशी घालवली जाणार ? पक्ष त्यांना कशा पद्धतीने हाताळणार ? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.