त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची बदली मुख्यालयात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत.

दरम्यान विविध कारणांवरुन सतत चर्चेत असलेले आणि कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या क्षणातही वादग्रस्त ठरलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे मुख्यालयात रवानगी झाली आहे.

त्यांच्याजागी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पांडूरंग पवार यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे पो.नि.पवार अगदी सुरुवातीपासून शहर पोलीस ठाण्यासाठी आग्रही होते,

मात्र आता त्यांची ‘फायनल पोस्टिंग’ झाल्याने शहरासाठी इच्छुक असलेला आणखी एक स्पर्धक कमी झाला आहे. शुक्रवारी (ता.6) जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी

त्यांचे वाचक म्हणून जबाबदारी असलेल्या पांडूरंग पवार यांना संगमनेर तालुका तर नियंत्रण कक्षातील महिला पोलीस निरीक्षक ज्योति गडकरी यांना आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविली.

त्यासोबतच जिल्ह्याबाहेरुन बदलून आलेल्या घनश्याम बळप यांना पारनेर तर महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांना जिल्ह्याच्या भरोसा सेलची जबाबदारी सोपविण्यात आली.

याच आदेशात पो.नि.पाटील यांची 30 ऑक्टोबर रोजी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली, मात्र ते अद्याप हजर झाले नसल्याने पो.नि.पवार यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार घेवून

पो.नि.पाटील यांना पदमुक्त करण्याचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार पो.नि.पवार आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार असल्याचे समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24