शासनाच्या त्या निर्णयामुळे शिक्षक संघटनात विरोधाभास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- इयत्ता पाचवीचा वर्ग प्राथमिक शिक्षणात धरायचा की माध्यमिक शिक्षणात यावरून शिक्षक संघटनांमध्ये मतमतांतरे सुरू आहेत.

यातून एकमेकांना विरोध तसेच शासन निर्णयाला विरोध व स्वागत असे विरोधाभासी चित्र सुरू झाले आहे. पाचवीचा वर्ग आतापर्यंत माध्यमिकला जोडलेला होता व तो आता प्राथमिकला जोड़ला जाणार आहे,

यामुळे पाचवीला शिकवणारे शिक्षकही आता माध्यमिकऐवजी प्राथमिकचे होणार आहेत, यावरून शिक्षक संघटनांमध्ये रणकंदन सुरू आहे.

पाचवीचे शिक्षण कसे दर्जेदार करता येईल व त्यासाठी कोणते प्रयोगशील उपक्रम राबवता येतील आणि विद्यार्थ्यांना अधिक ज्ञानसंपन्न कसे करता येईल, यावर चर्चा झडण्याऐवजी पाचवीचा वर्ग कोठे जोडायचा,

यावरून सुरू असलेले शिक्षक संघटनांतील आरोप-प्रत्यारोप त्यामुळे चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने व शिक्षक भारतीने पाचवीचा वर्ग प्राथमिकला जोडण्यास विरोध केला आहे.

तर महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. विविध शिक्षक संघटनांकडून पाचवीच्या वर्गाबाबत घेतल्या जात असलेल्या भूमिकांमुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24