अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2020 : नगर लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध नाही, पण मनपा प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. शहरात यापूर्वी तीन लॉकडाऊन झाले.
त्यानंतरही रुग्ण वाढले, म्हणजे मनपा प्रशासन अपयशी झाले आहे, असा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
ते म्हणाले, लॉकडाऊनबाबत आयोजित बैठकीला सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापाऱ्यांना बोलावणे आवश्यक होते. लॉकडाऊनमध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन नियोजनपूर्ण असण्याची गरज आहे.
महापालिका यंत्रणा केवळ पत्रे ठोकताना दिसते, उपाययोजना करताना दिसत नाही. लॉकडाऊन जसे करता, तसे स्वतःच्या यंत्रणेत सुधारणा करावी. इतर शहरात लॉकडाऊनचा प्रयोग सुरू आहे. ते यशस्वी होत आहेत.
आपल्या येथे लॉकडाऊननंतर रुग्ण वाढले, म्हणजेच प्रशासन योग्य नियोजन करत नाही. प्रशासकीय अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नाही.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहे. नगर शहरासाठी केवळ कोरोना अनुषंगाने आयएएस दर्जाचा अधिकारी नेमावा, अशी मागणीही राठोड यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews