‘त्या’ अफवेने तळीरामांची धांदल आणि दुकानांसमोर लागल्या रांगा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :  आजवर आपण पाणी,जेवण अथवा जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे पहिले आहे. मात्र श्रीरामपुरात याच्या विरुद्ध चित्र पहायला मिळाले.

कोरोनाबाधित रुग्ण सापडला असून, शहर बंद होणार आहे. अशी अफवा पसरली आणि तळीरामांची एकच धांदल उडाली. आठवडाभराची व्यवस्था करण्यासाठी दारूच्या दुकानांसमोर दारू खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली.

शहरातील गोंधवणी रोड परिसरात कोरोनाचा रुग्ण मिळून आला. त्यानंतर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर आठ दिवस बंद ठेवण्याची सूचना केली.

आदिक यांनी तसे पत्र प्रांताधिकारी अनिल पवार यांना दिलेले ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि गोंधळाला सुरवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागापर्यंत बंदची अफवा पोहोचली.

शहरात किराणा दुकानांत खरेदीसाठी गर्दी झाली. मात्र त्यापेक्षाही तळीरामांनी दारुच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केली होती. शहर आठ दिवस बंद राहणार या भितीने तळीरामांनी साठा करण्यावर भर दिला होता.

कारण यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये चढ्या भावाने दारूची खरेदी करावी लागली. तो झटका अद्यापही विसरलेले नसल्याने तळीरामांनी यावेळी मात्र खबरदारी घेतली.शहरातील सर्व दारुची दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत गर्दीने फुलली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24