महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांचा जामीन अर्ज फेटाळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- महिलेचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण करणाऱ्या नगर शहर कोतवालीचा पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

याबाबत एका महिलेने २९ सप्टेंबर रोजी वाघ याच्या विरोधात अत्याचाराची फिर्याद दिली होती. सरकारी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत व मारहाण करत विकास वाघ याने वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अत्याचारास प्रतिकार केल्यास कंबरपट्ट्याने वाघ याने मारहाण केल्याचेही महिलेने फिर्यादीत म्हटले होते वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून निरीक्षक वाघ फरार होता.

मध्यंतरी त्याच्या निलंबनाचीही कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली. दरम्यान, या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी वाघ याने जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.

यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. गुन्ह्यात आरोपीविरूद्ध भक्कम कागदोपत्री पुरावे आहेत.

आरोपीने गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर, पट्टा, बिअरची बाटली, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करणे बाकी आहे. आरोपीच्या अंगावरील कपडे, त्याचा मोबाईल, आरोपीने पिडितेच्या सह्या घेतलेले कागद व स्पॅम्प पेपर जप्त करणे बाकी आहे,

तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा, असा युक्तिवाद पवार यांनी केला.

पवार यांना मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. महेश तवले यांनी मदत केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24