‘त्या’ पथकाची कारवाई संशयास्पद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने जीपीओ चौकातील छावणी कॉम्प्लेक्समधील दुकानातून सोमवारी डिझेल साठा जप्त केला.

टँकर व ट्रकसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, या कारवाईबाबत चौकशी करण्याचे आदेश अधीक्षक मनोज पाटील दिले.

स्टेट बँक चौकात एकजण टँकरमधून डिझेलसदृश एनटीटी रसायन भरत असल्याची माहिती मिळताच डॉ. राठोड यांच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, हेड कॉन्स्टेबल भरत डंगोरे, गणेश डहाळे,

पोलिस नाईक अरविंद भिंगारदिवे, राजू चव्हाण, विनोद पवार, संजीव धामणे, अजित घुले यांनी तेथे छापा टाकला. ट्रकमधील १३७ लिटर डिझेल व टँकरमधील १८०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले.

हा गुन्हा जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येत असल्याने सूर्यवंशी यांनी पुरवठा अधिकारी कार्यालयास कळवले. त्यांच्याकडे डिझेल तपासणी किट उपलब्ध नसल्याने त्यांनी आपल्या स्तरावर कारवाई करावी, असे कळवले.

डिझेलच्या सहा बाटल्या सॅम्पल तपासणीसाठी नाशिक येथे पाठवल्या आहेत. याप्रकरणी गौतम वसंत बेळगे (३७, भगवानबाबा नगर, भिंगार) याला अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेले डिझेल बनावट असल्याचा संशय आहे. विशेष पथकाने जीपीअो चौकात सोमवारी दुपारी कारवाई केली. मात्र, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

इतका विलंब का झाला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारवाई योग्य होती की नाही, याबाबत पोलिस अधीक्षकांनी श्रीरामपूर येथील पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24