अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पुणे शहरातला पॉश समजल्या जाणाऱ्या कॅम्प भागातल्या एका मॉल मध्ये ही अभिनेत्री ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी आली होती. आपल्याला अंगठ्या घ्यायच्या आहेत असं तिने दुकानदाराला सांगितलं होतं.
त्यानंतर दुकानदाराने तिला अंगठ्या दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी तिने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून अंगठ्या दोन अंगठ्या चोरल्या. स्नेहलता पाटील असं त्या अभिनेत्रीचं नाव आहे.
स्नेहलता या दुकानात गेल्यानंतर त्यांनी खूप प्रकारच्या अंगठ्या पाहिल्यात. त्यानंतर त्या दुकानादाराला आणखी नवे प्रकार दाखवा असं सांगत होत्या. चोखंदळ ग्राहक दिसते असं समजून ते जेव्हा नव्या डिझाइनच्या अंगठ्या आणायला गेले त्याचवेळी तिने दोन अंगठ्या चोरल्या.
सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. दुकानदाराला हा प्रकार समजताच त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली. याबाबत लष्कर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजबघून स्नेहलता पाटीलला अटक करण्यात आलीय.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com