संगमनेरमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे.

इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. संगमनेर तालुक्याने दोन हजार 956 ची संख्या गाठली आहे. वाढते रुग्ण आणि वैद्यकीय व्यवस्थेवर येणारा ताण पाहता

संगमनेर तालुक्यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्याकडे लक्ष्य केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून चाचण्यांचा वेग वाढवला आहे.

कोविडची लागण होवूनही लक्षणांअभावी ते समजत नसल्याने अशी व्यक्ति अनेकांना संक्रमित करणारी वाहक ठरु शकते. अशा रुग्णांचा शोध घेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे गरजेचे असल्याने, प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

प्रशासनाने या चाचण्यांची सुरवात शासकिय विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांपासून केली. संगमनेरच्या महसूल विभागातील पोलिस पाटलांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या.

यातून दोन पोलिस पाटलांसह 72 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन तिन दिवसांत रुग्णसमोर येण्याचा वेग काही प्रमाणात घटला,

मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा चाचण्यांचा वेग वाढल्याने शहरासह तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची गतीही वाढली आहे. दरम्यान,

तालुक्यात कोरोना बाधितांसाठी उपयुक्त ठरणारे ‘रेमडीसीव्हीर’ हे औषध तालुक्यातील एकाही रुग्णालयात व औषधांच्या दुकानात उपलब्ध नाही.

औषध नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड होत आहे. हे औषध आणण्यासाठी बाहेरील तालुक्यांत जावे लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे समोर आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24