Maharashtra news : कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पुणतांबा येथील शेतकरी आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
मंगळवारी ७ जूनला मुंबईत सर्व संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. बैठकीला पुणतांब्यातील शेतकऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे..
त्या बैठकीनंतर आंदोलनासंबंधी पुढील निर्णय होणार असल्याने तोपपर्यंत सध्या सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी दिली.