काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बलिशपणाचा आहे: राम कदम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बलिशपणाचा आणि अत्यंत बिनबुडाचा आहे. अत्यंत अर्धवट ज्ञानाच्या जोरावर केलेला हा आरोप आहे.

महा विकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे ४ हजार कोटीचे नुकसान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशातले पैसे जाणार आहेत.

एवढ्या पैशांचा चुराडा होत असतानाही हे महाविकास आघाडी सरकार मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत. प्रत्येक दिवसाला साडेचार कोटीपेक्षा अधिक नुकसान आहे.

मागच्या दहा महिन्यांमध्ये मेट्रोचे १ टक्कासुध्दा काम झालेलं नाही याला जबाबदार कोण. ही वस्तुस्थिती असूनही खोटा आरोप करायचे महाविकास आघाडी सरकारच्या प्रवक्त्यांची सवय आहे असं मत भाजप आमदार राम कदम यांनी व्यक्त केलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24