आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल – अनिल देशमुख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या पाच वर्षाचा कार्यकाल पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादा मधील पक्षीय मेळाव्या साठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौरा वर आले होते.

राष्ट्रवादी च्या मेळाव्याच्या व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकत्र दिसुन आले. यावेळी खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी खान्देशात चांगली मजल मारेल असा विश्वास व्यक्त करत

गटातटाचे राजकारण विसरुन जिल्ह्यातील पक्षीय कार्यकर्त्यांनी काम करण्याचा सल्ला देखील यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादिच्या बळकटीसाठी पक्षीय संगठण मजबुत करतील असा विश्वास आम्हाला आहे असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24