दीडशे वर्षाची परंपरा असलेला या गावातील जनावरांचा बाजार  पुन्हा भरणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-राज्यासह देशात प्रसिध्द असलेला व दीडशे वर्षाची परंपरा असलेला वाळकी येथील जनावरांचा बाजार गेल्या पंधरा वर्षापासून विविध कारणामुळे बंद पडला होता .

मात्र येथील व्यापारी वर्ग व ग्रामस्थांनी बैठक घेऊन बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे सोमवार दि .१९ रोजी जनावरांचा आठवडे बाजार भरणार आहे .

वाळकीचा  जनावरांचा आठवडे बाजार सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे गेल्या पंधरा वर्षापासून बंद झाल्याने बाजारात लाखोंची होणारी उलाढाल ठप्प झाली होती.

येथील स्थानिक व्यापारी व ग्रामस्थ बाजार सुरु करण्याचा प्रयत्न करत असतानाच सर्वत्र कोरोनाचे संकट ओढावले . त्यामुळे राज्यातील सर्वच आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला .

मात्र राज्य शासनाने सध्या आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने वाळकीचा बंद पडलेला जनावरांचा आठवडे बाजार सुरू करण्याचा दृढनिश्चय व्यापारी व ग्रामस्थांनी घेतला आहे .

सोमवार दि .१९ रोजी बाजार सुरू होणार असून व्यापाऱ्यांनी बैल , संकरीत गाई ,गावरान गाई , म्हैस , शेळी , मेंढी ,भाजीपाला कापडविक्रीसह इतर जीवनावश्यक वस्तूंचा आठवडे बाजार  कोरोनामुळे शासकीय नियमाच्या अधीन राहून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. व्यापारी व ग्रामस्थ व इतर यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24