शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल होणार ‘रथ यात्रे’ च्या माध्यमातून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- कृषी विधयेक कायद्यावरून देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. यातच एवढे दिवस होऊनही सरकार या शेतकऱ्यांना न्याय देण्यास तयार नाही, यामुळे या आंदोलनाची झळ आता गावपातळीपर्यंत पोहचली आहे.

यामुळे गावपातळीवर देखील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांब्यात रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलखोल रथ यात्रेस किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव व कृषी कन्या निकीता जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.

राष्ट्रीय किसान मजदूर महासंघ, राष्ट्रीय किसान महासंघ, भारतीय किसान युनियन, किसान क्रांती जनआंदोलन या देश पातळी वरील संघटनांच्या एकत्रीत येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकरी विरोधात आहे.

या पोलखोल यात्रेची सुरुवात पुणतांबा येथून करण्यात येत आहे. कारण याच गावात शेतकरी आंदोलनास देशातील पहिली सुरुवात झाली आहे. शिवाय आमची ओळख पुणतांब्याचे शेतकरी अशी तयार झाली.

पोलखोल यात्रेची सांगता नांदेड येथे होणार असून दिल्ली येथे 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संदीप गिट्टे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24