अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरातील बजरंगवाडी येथे राहणारे महिला संगिता रंजन माळी या आईच्या घरी सौ . अनिता दिगंबर निकम , वय २५ , रा . पिंपळवाडी तुरकणे वीटभट्टी , राहाता ही तरुणी मुलांसह राहण्यासाठी आली असता तेथे काल ८. ३० च्या सुमारास अनिता यांचा पती दिगंबर हरिश्चंद्र निकम, रा. पिंपळवाडी हा आला व पत्नी व मुलांना घरी जाण्यासाठी म्हणाला तेव्हा सासू संगिता माळी व पत्नी अनिता निकम यांनी दिगंबर याच्यासोबत जाण्यास नकार दिला.
या कारणावरून राग येवून कुऱ्हाड घेवून सासू व पत्नी अनिता हिची आई संगिता रंजन माळी या महिलेच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व धमकी दिली.
या प्रकरणी अनिता दिगंबर निकम या विवाहितेच्या फिर्यादीवरुन आरोपी दिगंबर हरिश्चंद्र निकम , रा . पिंपळवाडी याच्याविरुद्ध राहाता पोलिसांत भादवि कलम ३०७ , ५०६ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून डिवायएसपी वाघचौरे , सपोनि कुंढारे यांनी भेट दिली. पोलीस पुढील तपास करीत आहे.