कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाचा आज शुभारंभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या काँक्रीटीकरण व सुशोभीकरणाचे मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन करण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्यासह स्थानिक आमदार-खासदार यांची प्रमुख उपस्थिती राहील.

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वे स्थानके आहेत.

एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टण्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगडमधील वीर, माणगाव व कोलाड, रत्नागिरीतील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड तर सिंधुदुर्गतील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.