मोठी बातमी : स्वस्त झाला सिलेंडर, वाचा काय असेल नवीन किंमत ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाउन सुरू आहे. यादरम्यान घरगुती गॅस (एलपीजी) वापरणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा सरकारने दिला आहे.

शुक्रवार 1 मेपासून विना सब्सिडी असलेले एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 162 रुपयांनी घट केली आहे. हे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. 

दिल्लीमध्ये विना सब्सिडी वाले सिलेंडर 162.50 रुपयांनी कमी झाले आहे. हे सिलेंडर आधी 744 रुपयांना होते, पण आता याची किंमत 581.50 रुपये प्रती सिलेंडर झाली आहे.

मुंबईमध्ये नवीन दर 579 रुपये प्रती सिलेंडर आहे. विना सब्सिडी वाला सिलेंडर कोलकातामध्ये 584.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 569.50 रुपयांना मिळेल.

सरकार घरगुता वापरणाऱ्यांना एका आर्थिक वर्षात 12 सिलेंडर सब्सिडी दरावर देते आणि यापेक्षा जास्तीची मागणी असेल, तर बाजार भावाप्रमाणे दर द्यावा लागतो. हा सलग चौथा महिना आहे, जेव्हा सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24