राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला रुचलेले नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत.

यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, असे बोलताच आमदार रोहित पवार यांनी प्रतिस्पर्धी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला हल्ला चढवला आहे.

तसेच पुढे बोलताना पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील चांगली टीका केली आहे. पवार म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार तीन महिन्यात कोसळेल,

असे वक्त्व्य फडणवीस करतात. परंतु 14 महिने झाले तरी सरकार कोसळू शकले नाही. आमचे सरकार शेतकरी हिताचे, विकासाचे आणि विचारांचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार हे नगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. पवार म्हणाले, राज्यातील शेतकरी होताच हे सरकार भाजपला रूचले नाही. भाजप नेते अमित शहा यांनी शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती असे वक्तव्य केले.

यावर पवार यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेवटच्या काळात भाजपने विश्वासघात केला असे वाटले असावे.

यामुळे त्यांनी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी केली. नवे समिकरण तयार झाले. संपूर्ण देशभरातील घटक पक्षांचाही आवाज वाढला. हे भाजपला रूचले नाही. त्यामुळे हे अमित शहा यांचे व्यक्तीगत मत असावे, असेही पवार म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24