सोलापूर :- सिद्धेश्वर तलावाशेजारील खंदक बागेच्या भिंतीजवळ शुक्रवारी सकाळी एका अनोळखी व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे. दोघेही भिक्षेकरी असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खंदक बागेच्या भिंतीजवळच्या एका झाडाला एका ४६ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत सिद्धेश्वर मंदिराच्या मैदानात ५० ते ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेलाही शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेचे कारण अथवा दोघांची नावे अद्याप समोर आली नाहीत. याबाबत पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांना विचारले असता, अद्याप दोघांची ओळख पटली नाही.