नागपूर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. हैदराबाद येथील महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूर मध्ये एक अमानुष प्रकार समोर आलाय.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. नीलम शांताराम धुर्वे (६) असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजला पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मुलीवर अत्याचार झाला की नाही हे सांगता येईल. अशी पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. लिंगा या गावापासून जवळ पीडित मुलीच्या आजीचे घर आहे. मुलगी नेहमी आपल्या आजीकडे जायची.
शुक्रवारी नेहमीप्रमाणे मुलगी सकाळी घरून निघाली. ती आजीकडे गेली असेल असे समजून घरच्यांनी शोध घेतला नाही.