अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे हंगा नदीजवळील एका विहिरीत आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला.
हे पण वाचा ; शेतकऱ्याच्या मुलीचे यश… विक्रीकर निरीक्षक परीक्षेत पहिला नंबर !
मीना गणेश आढाव (वय ३२, रा. कोरेगव्हाण, ता. श्रीगोंदा), अनुजा गणेश आढाव (वय ६) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. दरम्यान हा घातपात असावा असा संशय विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.
हे पण वाचा ; अहमदनगर ब्रेकिंग : आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणेश परशुराम आढाव हे वडील, पत्नी, मुलगीसह कोरेगव्हाण येथे राहत होते. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पत्नी व मुलगी घरातून बाहेर पडल्या असे पती गणेश आढाव यांनी सांगितले
हे पण वाचा ; नौकरी अपडेट्स : सारस्वत बँकेत 100 जागांसाठी भरती
सोमवारी सकाळी ग्रामस्थ, विवाहितेच्या नातेवाईकांनी कोरेगव्हाण येथे शोध घेतला. गणेश आढाव याच्या घराच्या मागे हंगा नदी तिरा जवळ विहिरीजवळ विवाहितेच्या चप्पला आढळून आल्या.
हे पण वाचा ; अहमदनगर जिल्ह्यातील हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता विवाहिता व मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
हे पण वाचा ; प्राजक्त तनपुरे म्हणाले मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते…
हे पण वाचा ; माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वास सुरुंग!
हे पण वाचा ; विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर