धबधब्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- पारनेर तालुक्यातील कर्जुुुले  हर्या जवळील मांडओहळ धरणाजवळ असलेल्या रूईचोंढा धबधब्यात दि. २५ रोजी तरुण आंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्ड्यांमध्ये पडून बुडाला होता त्याचा मृतदेह आज दि.२७ रोजी दुपारच्या सुमारास पाण्यातून बाहेर येऊन तेथेच पोलिसांना सापडला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रेयश नवनीत जामदार (वय १८ वर्षे  रा.शिरूर)  त्याचे मित्र रूईचोंढा धबधबा पाहण्यासाठी आले होते . या ठिकाणी ते अंघोळ करत असताना त्यांच्यापैकी श्रेयश जामदार  धबधब्याजवळ असलेल्या पाण्याच्या कुंडात पडला व खोल पाण्यात बुडाला होता.

धबधब्याच्या खाली असणारा तो खड्डा खोल असल्याने व आतमध्ये रांजणखळगे प्रमाणे आकार असल्याने त्याचा मृतदेह कुठेतरी कपारीला अडकला असण्याची शक्यता होती त्या दृष्टीने पोलीस तपास करत होते धबधब्यापासून काही अंतरावर पोलिसांनी मृतदेह अडविण्यासाठी झाडे व दोरखंड बांधले होते तसेच पोलिस सदर घटनेवर लक्ष ठेवून होते.

आज दुपारच्या सुमारास मृतदेह कुंडातुन बाहेर आला. त्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिल्यानंतर घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढील कारवाई केली. काही दिवसांपूर्वी रूईचोंडा धबधबा येथे नगर येथील रेल्वे पोलिस पडला होता

त्यानंतर त्याचा मृतदेह ३ दिवसांनी तेथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर सापडला होता. सोशल मिडियावर रूईचोंढा धबधबा मोठ्या प्रमाणात चर्चेत असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही पर्यटक येथे गर्दी करीत आहेत.

या ठिकाणी येणारे तरुण पर्यटक बेजबाबदारपणे वागत असतात, तसेच या ठिकाणी कोणतीही आपत्कालीन सुुुुविधा उपलब्ध नसल्याने अनेेेकदा अपघात होत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24