बोंबा बोंब आंदोलनाला मिळाले यश; कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जामखेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार व्हावेत म्हणून नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले.

या आंदोलनात नगर परिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते या आंदोलनाला यश येऊन मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सप्टेंबर महिन्याचे पगार तात्काळ व आँक्टोबर महिन्याचा पगार २५ तारखेला करण्याचे लेखी आश्वासन दिले यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर व सप्टेंबर या दोन महिन्याचे पगार देण्यात आले नव्हते. दिवाळीच्या सणासाठीआम्हाला आमच्या मुलाबाळांची कपडे व कुटुंबाची गोड दिवाळी करण्यासाठी आमचा दोन महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा अशी मागणी करत होते.

लोकाधिकार समिती व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड खाऊ द्या.

नाहीतर मी तुम्हाला दिवाळी सुखाने खाऊ देणार नाही आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. आमदार रोहित दादा पवार व जिल्ह्याचे खासदार मा. सुजय विखे पाटील यांच्या दारात जाऊन दिवाळी मागणार आहोत.

अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. दरम्यान आंदोलकांपुढे प्रशासन झुकले असून जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी सप्टेंबर महिन्याचे पगार तात्काळ व आँक्टोबर महिन्याचा पगार २५ तारखेला करण्याचे लेखी आश्वासन दिले यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24