पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर उस्मानाबाद-अहमदनगर मार्गे पोहोचला पाक सीमेवर, नंतर झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- प्रेमासाठी वाट्टेल ते करणारे अनेक बहाद्दर या समाजात आहेत. प्रेमात सगळं काही माफ असत असे म्हणत प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याचा विचार अनेक प्रेमवेडे करत असतात.

असाच एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. यासाठी त्याने उस्मानाबाद ते अहमदनगर असा सायकलवरून तर अहमदनगर ते पाक सीमेपर्यंत दुचाकीवरून प्रवास केला.

परंतु या वेड्या आशिकाला भारत-पाक सीमेवरुन सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतलं. याबाबत अधिक माहिती अशी: इंजिनिअरींगचा विद्यार्थी असणाऱ्या झिशान सिद्धिकी (वय- 20)

या प्रेमवेड्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका तरुणीशी जुळलेल्या प्रेमाला खरे करण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानला जाण्याचे ठरवले.

उस्मानाबादहून तो अहमदनगरपर्यंत चक्क सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरातमधील आंतराष्ट्रीय सीमेपर्यत दुचाकीनं प्रवास केला. मात्र, सीमेच्या जवळील वाळूत त्याची दुचाकी अडकल्यामुळे तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता.

मात्र, सुरक्षा जवानांनी सीमेवर वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडली. नंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली असता पाकिस्तान आणि कच्छ सीमेवर फिरत असलेल्या झिशान याला ताब्यात घेतलं.

झिशान याला बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता झिशान हा उस्मानाबाद येथून दुचाकीने थेट भारत-पाक सीमेवर कसा पोहोचला तसेच इतर काही शंकास्पद आढळतंय का  याचा तपास पोलीस करत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24